TSK

TSK · नहे 9:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ परंतु कदाचित ते आपली पापे व आपल्या वाडवडीलांची पापे व त्यांनी माझ्याविरूद्ध अपराध केला व माझ्या विरुध्द चालले हे कबूल करतील.

कारण त्यांनी आपणाला व आपल्या मुलांना त्यांच्या काही स्त्रिया करून घेतल्या आहेत आणि पवित्र लोक इतर देशाच्या लोकांबरोबर मिसळून गेले आहेत. आणि अधिकारी व नेते हेच प्रथम यामध्ये अप्रामाणिक आहेत.”

¶ हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तू न्यायी आहेस. तू आजच्याप्रमाणे आम्हास वाचवून अवशेष ठेवले आहेस. पाहा, आम्ही इथे तुझ्यापुढे आमच्या अपराधामुळे आहोत, यामुळे तुझ्यापुढे कोणालाहि उभे राहता येत नाही.”

¶ तुझा सेवक अहोरात्र तुझी प्रार्थना करत आहे, ती तू कृपाकरून डोळे उघडून पाहा आणि कान देऊन ऐक, तुझ्या सेवकांच्या म्हणजेच इस्राएलाच्या वतीने मी प्रार्थना करत आहे. आम्ही इस्राएल लोकांनी तुझ्याविरुध्द जी पापे केली आहेत, ती मी कबुल करतो की, मी व माझ्या वडीलांच्या घराण्याने पाप केले आहे.

हा नियम ऐकताच विदेशी लोकांस इस्राएलातून वेगळे करण्यात आले.

आम्ही आमच्या पूर्वजांसारखेच पाप केले; आम्ही चूक केली आणि आम्ही दुष्कृत्ये केली.

मला या परक्यांच्या हातातून मुक्त कर व मला वाचव. त्यांचे मुख असत्य बोलते; आणि त्यांचा उजवा हात असत्याचा आहे.

¶ मी हे जाणून माझे मुख परमेश्वर देवाकडे वळवले, यासाठी की उपास करून व गोणताट व राख अंगावर घेऊन प्रार्थना व विनंत्या यांनी त्यास मागणे करावे.

ते परमेश्वराशी अविश्वासू राहिले; कारण त्यांनी अनैरस मुलांना जन्मास घातले आता चंद्रदर्शन होताच त्यास भूमीसहीत खाऊन टाकेन.