TSK

TSK · गण 1:4

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मोशेने इस्राएल लोकांतून चांगले लोक निवडले आणि त्यांना हजार हजार, शंभर शंभर, पन्नास पन्नास व दहा दहांवर नायक म्हणून नेमले.

¶ मोशे, अहरोन आणि इस्राएलांच्या प्रत्येक घराण्यातील एक प्रमुख असे बारा नेते, ह्यानी ही मोजदाद केली.

¶ मोशे, अहरोन व इस्राएलाच्या मंडळीचे पुढारी ह्यानी कहाथी लोकांची, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती केली.

¶ मोशेने वेदीला अभिषेक केला त्या दिवशी अधिपतींनी वेदीला आपला माल समर्पित करण्यासाठी आणला. अधिपतींनी आपली अर्पणे वेदीसमोर अर्पिली.

“कनान देश हेरण्यासाठी काही लोकांस पाठव. हाच देश मी इस्राएल लोकांस देणार आहे. त्यांच्या बारा वंशानुसार प्रत्येकी एका सरदाराला पाठव.”

¶ परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्या सर्व लोकांच्या पुढाऱ्यांना आण, नंतर त्यांना परमेश्वराकरता भरदिवसा फाशी दे म्हणजे परमेश्वराचा इस्राएलावर भडकलेला राग जाईल.”

प्रत्येक वंशाचा एक प्रमुख वतन म्हणून देशाची विभागणी करण्यास घ्यावा.

आणि त्याच्याबरोबर इस्राएलाच्या प्रत्येक वंशातील पूर्वजांच्या घराण्याचा एकएक अधिकारी असे दहा अधिकारी पाठवले; आणि त्यांच्यातील प्रत्येकजण इस्राएलातील आपापल्या वंशाचा प्रमुख होता.