TSK

TSK · गण 12:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मित्रांशी बोलावे त्याप्रमाणे परमेश्वर मोशेबरोबर समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे माघारी जात असे. तरी मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा, हा तरुण मंडप सोडून बाहेर येत नसे.

¶ परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मरणानंतर असे झाले की, नूनाचा पुत्र यहोशवा, मोशेचा मुख्य मदतनीस याच्याशी परमेश्वर बोलला,

‹तर मग तुम्ही बाहेर कशाला गेला होतात? संदेष्ट्याला पाहायला काय? होय. मी तुम्हास सांगतो आणि संदेष्ट्यांपेक्षाही अधिक मोठा असा त्याला.›

मोशेने तर सांगितले की, ‘प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या भावांमधून उठवील. तो जे काही तुम्हास सांगेल ते सर्व त्याचे ऐका.’

या दृष्टीकोणातून हे गरजेचे आहे की जबाबदारी असलेल्या कारभाऱ्याने विश्वासू असले पाहिजे.

देवाच्या संपूर्ण घराण्यात जसा मोशे देवाशी विश्वासू होता तसा ज्या देवाने त्यास प्रेषित व महायाजक म्हणून नेमले त्याच्याशी तो विश्वासू होता.