परमेश्वर त्याच्यापुढून अशी घोषणा करीत गेला: “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू, कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर,
TSK
TSK · गण 14:18
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
पण तू म्हणतोस देव वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा करतो. तर त्याने त्यालाच प्रतिफळ द्यावे म्हणजेच त्यास त्याचा दोष कळेल.
परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे; तो सहनशील आहे; त्याच्यामध्ये महान कराराची विश्वासयोग्यता आहे.
यास्तव परमेश्वर, इस्राएलचा देव, त्या मेंढपाळांना, जे त्याच्या लोकांस चारतात, त्याविषयी असे म्हणतो, “तुम्ही माझ्या मेंढरांना विखरले आणि त्यांना घालवून लावले आहे. तुम्ही त्यांची काळजी घेतली नाही. हे जाणून घ्या, मी तुम्हास तुमच्या वाईट कृत्यांबद्दल परत फेड करीन.” परमेश्वर असे म्हणतो.
आमच्या पूर्वजांनी तुझ्याविरुध्द पाप केले. आता ते नाहीत. पण त्यांच्या पापाची फळे आता आम्ही भोगत आहोत.
तुझ्यासारखा देव कोण आहे? जो तू पापांची क्षमा करतोस आणि आपल्या वतनाच्या उरलेल्यांचा अपराध मागे टाकतो. तो अनंतकाळ क्रोधाविष्ट राहणार नाही, कारण त्यास दयाळू व्हायला आवडते.
देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामुल्य नीतिमान ठरतात.
त्या प्रिय पुत्राच्या ठायी रक्ताने खंडणी भरून आम्हास मुक्त करण्यात आले आहे, देवाच्या कृपेच्या विपुलतेने आम्हास आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे.