TSK

TSK · गण 20:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तेव्हा इस्राएल लोक मोशेविरूद्ध उठले व त्याच्याशी भांडू लागले. ते म्हणाले, “आम्हांला प्यावयास पाणी दे.” मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही मजशी का भांडता? तुम्ही परमेश्वराची परीक्षा का पाहत आहात?”

¶ ते मांस त्यांच्या दातात होते, ते चावण्याच्या आधीच परमेश्वराचा राग त्यांच्यावर भयंकर भडकला. त्यांने लोकांचा भयंकर आजाराने संहार केला.

¶ मोशेने ज्या लोकांस नवीन प्रदेश शोधण्यासाठी पाठवले होते त्याच लोकांनी परत येऊन इस्राएल लोकांमध्ये तक्रारी पसरावयाला सुरुवात केली. ते लोक म्हणाले की त्या प्रदेशात जाण्याइतके आपले लोक शक्तीवान नाहीत.

¶ जेव्हा मोशेचे बोलणे संपले तेव्हा त्या लोकांच्या पायाखालची जमीन दुभागली.

कारण तिने माझ्या जननीचे ऊदरद्वार बंद केले नाही, आणखी हे दुःख माझ्या डोळ्यापासून लपवीले नाही.