TSK

TSK · गण 31:15

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

त्यांच्या सर्व नगरांचा आम्ही ताबा घेतला व पुरुष, स्त्रिया, मुलेबाळे ह्याच्यासह सर्वांचा समूळ नाश केला, कोणालाही जिवंत ठेवले नाही.

पण तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशातील नगरे तुम्ही ताब्यात घ्याल तेव्हा तिथे मात्र कोणालाही जिवंत ठेवू नका.

त्या दिवशी आय नगरातली सगळी माणसे पडली, त्यामध्ये सर्व स्त्रिया आणि पुरुष मिळून ती बारा हजार होती.

या नगरातील सर्व मालमत्ता व गुरेढोरे इस्राएल लोकांनी लुटून नेली, पण त्यांनी तलवार चालवून प्रत्येक मनुष्य मारून टाकला, एकही जिवंत प्राणी जिवंत ठेवला नाही.

हे बाबेलाच्या कन्ये, तू लवकरच ओसाड पडणार आहेस, कारण जसे तू आम्हास केले तसे, जो तुला परत करील तो आशीर्वादित आहे.

म्हातारे असो, तरुण, कुमारी, लहान मुले किंवा स्त्रिया सर्वांना मारुन टाका. पण ज्याच्या माथ्यावर खुण आहे त्याच्याजवळ जाऊ नका. माझ्या पवित्र ठिकाणाहून सुरुवात करा, मग म्हाताऱ्यापासून सुरुवात केली व माझ्या निवासापुढे आले.