¶ अहरोन व सर्व मंडळी दर्शनमंडपामध्ये सेवा करीत असता लेवी लोक त्यांना मदत करतील. त्यांनी निवासमंडपात सेवा करावी.
TSK
TSK · गण 31:30
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
पवित्र कराराचा कोश, मेज, दीपस्तंभ, वेद्या, पवित्रस्थानाची सेवेसाठी असलेली पात्रे, पडदा व इतर सर्व वस्तूंची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.
त्यांनी दर्शनमंडपामध्ये सेवा करणाऱ्या आपल्या बंधूंना त्यांच्या कामात मदत करावी, परंतु त्यांनी अधिक सेवा करु नये. तू लेव्यांना या सर्व गोष्टीत मार्गदर्शन करावे.
¶ लेवीचे जे वंशज दर्शनमंडपामध्ये काम करतात ते त्याच्याविरुध्द केलेल्या पापाला जबाबदार असतील. हा नियम नेहमी अस्तीत्वात राहील. लेव्यांना इस्राएल लोकांमध्ये वतन नसावे.
यहोशवाने त्या दिवशी मंडळीसाठी आणि परमेश्वर निवडणार होता त्या स्थानी त्याच्या वेदीसाठी गिबोन्यांना लाकूड तोडणारे व पाणी काढणारे म्हणून नेमले; तसे ते आजपर्यंत आहेत.
¶ ते दर्शनमंडप, पवित्रस्थानाचे प्रमुख होते. आणि त्यांचे सहकारी अहरोनाचे वंशज यांना ते परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेत मदत करत होते.
मेंढपाळांच्या वस्त्यांवर आसाच्या सैन्याने धाड घातली. तेथून त्यांनी बरीच मेंढरे आणि उंट घेतले आणि ते यरूशलेमेला परतले.
या दृष्टीकोणातून हे गरजेचे आहे की जबाबदारी असलेल्या कारभाऱ्याने विश्वासू असले पाहिजे.
अर्खिपाला सांगा की, जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे म्हणून काळजी घे.