पवित्र निवासमंडप व वेदी ह्यांच्या सभोंवतीच्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या दाराचा पडदा, त्यांच्यासाठी लागणारे तणावे व इतर सामान यांची निगा राखण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.
TSK
TSK · गण 4:24
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
जेव्हा ते परमपवित्रस्थानातील वस्तूजवळ जातील तेव्हा त्यांनी मरू नये पण जगावे म्हणून अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी आत जाऊन त्यांच्यातील एकएकाला त्यांचे काम व ओझे नेमून द्यावे.
¶ दर्शनमंडपाच्या ज्या वस्तू वाहून नेण्याची जबाबदारी त्यांना करावी लागेल ती हीः निवासमंडपाच्या फळ्या, अडसर, खांब, उथळ्या, वाहून नेण्याचे काम त्यांनी करावे.
¶ तेव्हा परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याची गणती करण्यात आली; प्रत्येक मनुष्यास त्याने स्वत: करावयाचे काम नेमून देण्यात आले व त्याने काय वाहून न्यावयाचे ते सांगण्यात आले. हे सर्व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे करण्यात आले.
¶ गेर्षोन व मरारी वंश निवासमंडपाची काळजी घेण्यासाठी होते, त्यांनी निवासमंडप खाली काढला आणि मग तो उचलून घेऊन त्यांच्या प्रवासास सुरवात केली.