जितक्या लोकांची मोजदाद होईल तितक्यांनी पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे अर्धा शेकेल द्यावा. हा अर्धा शेकेल परमेश्वराकरता केलेले समर्पण आहे.
TSK
TSK · गण 7:13
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ जेव्हा कोणी परमेश्वरासमोर अन्नार्पण घेऊन येईल, तेव्हा त्याने अर्पणासाठी सपीठ आणावे; त्याने त्यामध्ये तेल ओतावे व त्यावर धूप ठेवावा;
मोल देताना ते पवित्रस्थानातील चलनाप्रमाणे ठरविलेले असावे. शेकेल म्हणजे वीस गेरा.
त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
हातकुटीच्या पाव हिन तेलात मळलेल्या एक दशमांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे.
दहा चौंरग व त्यांच्यावरील दहा गंगाळे,
इतर पात्रे, फावडी, वाती कापण्याच्या कात्र्या, पळ्या, पितळी थाळ्या ही परमेश्वराच्या मंदिरातली सर्व उपकरणेही त्यांनी घेतली.
मंदिरासाठी देण्यात आलेले सोने, चांदी आणि इतर वस्तू देवाच्या घरासाठी जे अर्पण राजा अर्तहशश्त, त्याचे मंत्री, प्रमुख अधिकारी, आणि इस्राएल लोकांनी स्वखुशीने अर्पिले होते ते तोलून दिले.
बेलशस्सराने द्राक्षरस चाखल्यावर आज्ञा केली की, सोन्या चांदीची ती पात्रे घेवून या जी त्याचा बाप नबुखद्नेस्सराने यरूशलेमेच्या मंदिरातून आणली होती. ह्यासाठी की, राजा, त्याचे सरदार आणि त्याच्या पत्नी व उपपत्नी हयांना त्यातून द्राक्षरस पिता येईल.
तिच्या आईच्या सांगण्यावरून ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणारा योहानाचे शीर तबकात घालून मला इथे आणून द्या.”