TSK

TSK · गण 8:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू जाऊन आज आणि उद्या लोकांस पवित्र कर; त्यांनी आपले कपडे स्वच्छ धुवावेत.

आणि ते रक्त महारोगापासून शुद्ध ठरवावयाच्या मनुष्यावर सात वेळा शिंपडावे; मग तो शुद्ध झाला आहे असे सांगावे व त्यानंतर याजकाने माळरानात जाऊन त्या जिवंत पक्ष्यास सोडून द्यावे.

सातव्या दिवशी त्याने आपले डोके, दाढी, भुवया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावे; आपले कपडे धुवावे व पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध होईल.

¶ त्याच्या अंगाखालच्या कोणत्याही वस्तुला कोणी स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे, व त्या वस्तू जो उचलील त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.

ज्या मनुष्याने ती जाळून टाकली त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी; त्यानंतर तो छावणीत येऊ शकतो.

¶ नंतर जो मनुष्य शुद्ध असेल तो कालवडीची राख गोळा करेल. तो ती राख छावणीच्या बाहेर स्वच्छ जागी ठेवावी आणि ती इस्राएल वंशाच्या मंडळीकरता अशुद्धी दूर करण्याच्या पाण्यासाठी ती राखून ठेवावी, ती पापार्पण अशी आहे.

¶ त्या अशुद्ध मनुष्यास पुन्हा स्वच्छ करण्यासाठी जाळलेल्या कालवडीची राख तुम्ही वापरली पाहिजे. एखाद्या भांड्यात राखेवर ताजे पाणी टाका.

देवा माझे अपराध धुऊन टाक, आणि मला माझ्या पापांपासून शुद्ध कर.

तो पुष्कळ राष्ट्रांस शिंपडील, त्याच्याकडे पाहून राजे आपली तोंडे बंद करतील, कारण जे त्यांना सांगितले नव्हते ते पाहतील, आणि जे त्यांनी ऐकले नव्हते ते समजतील.”

मग तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडेल तेव्हा तुम्ही तुमच्या सर्व अशुद्धतेपासून तुम्ही शुद्ध व्हाल. आणि मी तुम्हास तुमच्या सर्व मूर्तीपासून शुद्ध करीन.

हे विधी केवळ दैहिक बाबी म्हणजे अन्न व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या औपचारिक धुण्याबाबत संबंधित आहेत. हे केवळ सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले आहेत.

तुम्ही देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पाप्यांनो, तुम्ही हात शुद्ध करा; अहो द्विमनाच्या मनुष्यांनो, अंतःकरणे शुद्ध करा.

मी त्यास म्हटले, “प्रभू, तुला माहित आहे.” आणि तो मला म्हणाला जे मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत; त्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या समर्पणाच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.