योजना करा, पण ती व्यर्थ करण्यात येईल; हुकूम करा, पण तो अमलांत येणार नाही, कारण देव आम्हाबरोबर आहे.
TSK
TSK · फिलि 4:9
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
“पाहा कुमारी गर्भवती होईल व पुत्राला जन्म देईल, आणि त्यास इम्मानुएल हे नाव देतील.” या नावाचा अर्थ, “आम्हाबरोबर देव.”
¶ ‹मला प्रभू, प्रभू म्हणणारा प्रत्येकजण स्वर्गाच्या राज्यात जाईलच असे नाही; तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल.›
‹आणि जे काही मी तुम्हास शिकविले आहे ते त्या लोकांस पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे.”›
आणि त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, ‹“देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे हेच माझे आई व भाऊ.”›
‹या गोष्टी तुम्हास समजतात तर त्याप्रमाणे वागल्याने तर तुम्ही धन्य आहात.›
‹आता ऊठ, आणि नगरात जा, तुला काय करायचे आहे, ते तुला तेथे कोणीतरी सांगेल.”›
आणि शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.
कारण देव हा बेशिस्तपणा आणणारा नसून, शांती आणणारा देव आहे. जशा सर्व मंडळ्या देवाच्या पवित्र लोकांच्या बनलेल्या असतात.
¶ शेवटी, बंधूंनो, आनंद करा तुम्ही आपली अधिकाधिक सुधारणा करा. तुमचे सांत्वन होवो. तुम्ही एकमनाचे व्हा व शांतीने रहा आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर राहील.
म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.
परंतु पूर्वी फिलिप्पैत आम्ही दुःख भोगून व अपमान सोसून, हे तुम्हास माहीतच आहे, मोठा विरोध असता, देवाची सुवार्ता तुम्हास सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले.
¶ बंधूनो, शेवटी आम्ही तुम्हास विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की, कोणत्या वागणूकीने देवाला संतोषवावे हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहा, त्यामध्ये तुमची अधिकाधिक वाढ व्हावी.
तुम्हाविषयी प्रभूमध्ये आमचा असा विश्वास आहे की, आम्ही तुम्हास जे सांगतो ते तुम्ही करीत असता व पुढेही करीत जाल.
¶ प्रभू तुझ्या आत्म्यासोबत असो. देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.
¶ वचनाप्रमाणे आचरण करणारे असा व फक्त ऐकणारेच असू नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता.
आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो आणि त्यास जे आवडते ते करतो.