मी त्याच्या ओठांच्या आज्ञेचे पालन करण्यापासुन मागे वळालो नाही, मी संपत्ती प्रमाणे माझ्या हृदयात देवाच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द ठेवले आहेत.
TSK
TSK · नीति 10:21
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
नितीमान मनुष्याचे मुख ज्ञान बोलते, आणि न्याय वाढवते.
म्हणून ते आपल्या वर्तणुकीचे फळ खातील आणि आपल्याच योजनांच्या फळाने भरले जातील.
म्हणून तू दूरदर्शीपणाविषयी शिक्षण घे, आणि तुझे ओठ तुझ्या विद्येचे रक्षण करतील.
शिक्षणाची उणीव असल्या कारणाने तो मरेल; तो आपल्या महान मूर्खपणामुळे बहकून जाईल.
आरोग्यदायी जीभ जीवनाचा वृक्ष आहे, परंतु कपटी जीभ आत्म्याला चिरडणारी आहे.
मूर्खाला बुद्धी नसताना तो ज्ञानाविषयी शिक्षण घेण्यासाठी पैसा का देतो, जेव्हा त्याची ते शिकण्याची क्षमता नाही?
ज्ञानाची वचने आरींसारखी आहेत. शिक्षकाची त्याच्या म्हणीच्या संग्रहातील वचने खोल ठोकलेल्या खिळ्यांसारखी आहेत. ती एकाच मेंढपाळाकडून शिकविण्यात आली आहेत.
माझ्या मना सारखे मेंढपाळ मी तुम्हास देईन, आणि ते तुम्हास ज्ञान आणि समज हे चारतील.
माझे लोक ज्ञान नसल्याने नाश पावत आहेत. कारण तुम्ही ज्ञानास नाकारले म्हणून मी सुध्दा तुम्हास माझे याजक म्हणून नाकारीन. माझे, तुमच्या देवाचे नियमशास्त्र तुम्ही विसरलात म्हणून मी ही तुमच्या मुलांना विसरेन.
‹आणि न्याय हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे; पण मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये वाईट होती;›
¶ आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.