TSK

TSK · नीति 4:12

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

माझ्या पायांत बळ दे, म्हणजे मी न अडखळता ताठ चालू शकेन.

तू माझ्या पायांखाली विस्तीर्ण असे स्थान केले आहे, म्हणजे माझे पाय कधीही घसरणार नाहीत.

तुझ्या नियमशास्त्रावर प्रेम करणाऱ्यास मोठी शांती असते, त्यास कसलेच अडखळण नसते.

नंतर तू आपल्या मार्गाने सुरक्षितपणे चालशील, आणि तुझ्या पायाला ठेच लागणार नाही;

जेव्हा तू चालशील, ते तुला मार्गदर्शन करील; जेव्हा तू झोपशील, तेव्हा ते तुझे रक्षण करील; आणि जेव्हा तू उठशील तेव्हा ते तुझ्याशी बोलेल.

येशूने उत्तर दिले, ‹“दिवसाचे बारा तास आहेत की नाहीत? दिवसा जर कोणी चालतो तर त्यास ठेच लागत नाही, कारण तो या जगाचा उजेड पाहतो;›

¶ असा देखील शास्त्रलेख आहे, “अडखळण्याचा दगड व अडथळ्याचा खडक झाला आहे.” ते वचन मानीत नसल्यामुळे अडखळतात आणि त्यासाठीच ते नेमलेले होते.