TSK

TSK · नीति 4:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तर आता तू दावीद राजा कडे जा आणि त्यास म्हण की, माझ्या स्वामी तुम्ही मला वचन दिले नाही काय? “खचित तुझा पुत्र शलमोन माझ्यानंतर राज्य करील, आणि तोच माझ्या राजासनावर बसेल?” तर मग अदोनीया का राज्य करीत आहे?

दावीद म्हणाला, “माझा पुत्र शलमोन अजून तरुण व अननुभवी आहे आणि परमेश्वराचे मंदिर मात्र विशेषतः उत्कृष्ट बांधले गेले पाहिजे, याकरिता की सर्व इतर देशात सुप्रसिध्द आणि वैभवशाली असे झाले पाहिजे. म्हणून मी त्याच्या बांधण्याची तयारी करीन.” असे म्हणून दावीदाने आपल्या मृत्यूपूर्वी बरीच तयारी केली.

परमेश्वरा, मला माहीत आहे, मनुष्याची वाट ही त्याच्याकडून नाही येत. चालत्या मनुष्यास आपली पावले नीट करता येत नाही.

एकमेकांशी एकमनाचे व्हा, उंच गोष्टींवर मन ठेवू नका, पण दीन अवस्थेत असलेल्यांकडे ओढले जा. स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नका.