TSK

TSK · नीति 6:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मग मोशे व अहरोन फारोकडे गेले. त्यांनी त्यास सांगितले, “इब्र्यांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘तू माझ्यापुढे नम्र होण्याचे कोठवर नाकारशील? माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांस जाऊ दे.

तेव्हा शमाया हा संदेष्टा रहबाम आणि यहूदाच्या वडिलधाऱ्या मंडळीकडे आला. शिशकच्या धास्तीने ही सर्व वडीलधारी मंडळी यरूशलेमेला जमली होती. शमाया रहबामाला आणि या सर्वांना म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे रहबाम, तू आणि यहूदाचे लोक यांनी माझा त्याग केला आहे. तुमचे आचरण माझ्या नियमांच्या विरुध्द आहे. तेव्हा मीही तुम्हास सोडून शिशकच्या हाती दिले आहे.”

तू मला माझ्या शत्रूंच्या हाती सोपवून दिले नाहीस. तू माझा पाय खुल्या विस्तीर्ण जागेत स्थिर केला आहे.