TSK

TSK · स्तोत्र 13:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तेव्हा योनाथान म्हणाला, “माझ्या वडिलाने देशास दुखीत करून सोडला आहे. मी हा थोडा मध चाखला आणि पाहा माझे डोळे कसे टवटवीत झाले आहेत?

हे परमेश्वरा, माझे बोलणे ऐक. माझे कण्हणे विचारात घे.

कारण तू माझा दिवा लावशील, परमेश्वर माझा देव माझ्या अंधाराचा प्रकाश करितो.

तुझ्या प्रेमदयेमध्ये मी आनंद आणि हर्ष करीन, कारण तू माझे दु:ख पाहिले आहेस.

जेव्हा ते अधाशीपणाने तप्त होतील, तेव्हा मी त्यांना मेजवानी देईन. मग त्यांनी उल्लास करून निरंतरची झोप घ्यावी व जागे होऊ नये म्हणून मी त्यांना मस्त करीन.” असे परमेश्वर म्हणतो.

हे परमेश्वरा, आमची अवस्था काय झाली याकडे लक्ष लाव. आमच्या अप्रतिष्ठेकडे नजर टाक.

कारण त्या सर्वावर तो प्रकाश चमकतो म्हणून असे म्हणले आहे “हे झोपलेल्या जागा हो, आणि मरण पावलेल्यातून ऊठ, आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल.”