“मूर्ती घडवून तिची गुप्तपणे स्थापना करणारा शापित असो.” या मूर्ती म्हणजे कोणा कारागीराने लाकूड, दगड किंवा धातू यांच्यापासून घडवलेल्या असतात. परमेश्वरास अशा गोष्टींचा वीट आहे! तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
TSK
TSK · स्तोत्र 41:13
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
इस्राएलाचा देव परमेश्वर अनादी काळापासून अनंतकाळापर्यंत धन्यवादित असो. सर्व लोकांनी “आमेन” म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.
परमेश्वर देव, इस्राएलाचा देव, धन्यवादित असो, तोच फक्त आश्चर्यकारक गोष्टी करतो.
इस्राएलाचा देव, माझा परमेश्वर, ह्याचा अनादिकालापासून अनंतकालापर्यंत धन्यवाद होवो. सर्व लोकांनी म्हणावे, “आमेन.” परमेश्वराची स्तुती करा.
प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो. परमेश्वराची स्तुती करा.
‹आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस› ‹तर आम्हास त्या दुष्टापासून सोडव. (कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरवही सर्वकाळ तुझीच आहेत.)›
¶ आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याला धन्यवाद असो; स्वर्गीय गोष्टीविषयी प्रत्येक आत्मिक आशीर्वाद देऊन ज्या देवाने आम्हास ख्रिस्ताकडून आशीर्वादित केले आहे.
¶ आणि त्यांनी नवे गाणे गाईलेः “तू गुंडाळी घेण्यास आणि तिचे शिक्के उघडण्यास योग्य आहेस, कारण तुला वधण्यात आले आणि तू आपल्या रक्ताने खंडणी भरून प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आणि राष्ट्रांतून देवासाठी माणसे विकत घेतली आहेत.
हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, जो तू आहेस आणि होतास, त्या तुझे आम्ही उपकार मानतो, कारण तुझे महान सामर्थ्य तू आपल्याकडे घेतले आहेस आणि राज्य चालविण्यास सुरूवात केलीस.