अहो भोळ्यांनो, तुम्ही समंजसपणा समजून घ्या आणि तुम्ही कोणी ज्ञानाचा द्वेष करता, त्या तुम्ही सुबुद्ध हृदयाचे व्हा.
TSK
TSK · रोम 1:14
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ मग येशू म्हणाला, ‹“हे पित्या, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभू मी तुझे उपकार मानतो कारण तू या गोष्टी ज्ञानी व बुद्धीमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकासारखे अशिक्षित आहेत त्यांना तू प्रकट केल्या.›
परंतु प्रभू म्हणाला, ‹“जा, राजांना आणि परराष्ट्रांना आणि इस्राएलाचे संतान यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे.›
तेव्हा त्याने मला सांगितले, ‹“जा मी तुला मी परराष्ट्रीयांकडे दूर पाठवतो.”›
तेथील रहिवाश्यांनी आम्हास अतिशय ममतेने वागविले, त्यांनी एक शेकोटी पेटविली आणि आमचे स्वागत केले, कारण पाऊस पडू लागाला होता व थंडीही होती.
स्वतःला ज्ञानी म्हणता म्हणता ते मूर्ख बनले.
¶ बंधूंनो, तुम्ही स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नये, म्हणून माझी इच्छा नाही की, तुम्ही या रहस्याविषयी अज्ञानी असावे. ते असे की, परजनांचा भरणा आत येईपर्यंत इस्राएलात काही अंशी अंधळेपण उद्धवले आहे.
¶ तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, ह्याशिवाय कोणाचे देणेकरी असू नका कारण जो दुसर्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्ण केले आहे.
कारण असे नियमशास्त्रात लिहिले आहे, “शहाण्यांचे शहाणपण मी नष्ट करीन आणि बुद्धिवंताची बुद्धि मी व्यर्थ करीन.”
¶ कोणीही स्वतःला फसवू नये, जर कोणी स्वतःला या जगाच्या दृष्टीने ज्ञानी समजत असेल तर त्याने खरोखर ज्ञानी होण्यासाठी “मूर्ख” व्हावे.
म्हणून जर मला भाषेचा अर्थ समजला नाही तर जो बोलत आहे त्याच्यासाठी मी विदेशी ठरेन व जो बोलणारा आहे तो माझ्यासाठी विदेशी होईल.
म्हणून जर संपूर्ण मंडळी एकत्र येते व प्रत्येकजण दुसऱ्या भाषेत बोलत असेल आणि जर एखादा बाहेरचा किंवा अविश्वासणारा आत आला, तर तुम्ही वेडे आहात असे ते तुम्हास म्हणणार नाही का?
¶ तुम्ही शहाणे असल्याने मूढांचे आनंदाने सहन करता!
ह्यात ग्रीक व यहूदी, सुंता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र हा भेदच नाही, तर ख्रिस्त सर्वकाही आहे व सर्वांत आहे.
कारण आपणही अगोदर अविचारी, अवमान करणारे व बहकलेले होतो; नाना वासनांचे व सुखांचे दास होतो, कुवृत्तीत व मत्सरात होतो. आपण अमंगळ मानले गेलो व एकमेकांचा द्वेष करणारे होतो;