मी तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये आणि तुझ्या वंशजांमध्येही पिढ्यानपिढ्या कायम लागू राहील असा सनातन करार करीन, तो असा की, मी तुझा आणि तुझ्यानंतर तुझ्या वंशजांचा देव होईन.
TSK
TSK · रोम 11:16
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
शेतात पेरलेल्या पहिल्या पिकाच्या कापणीचा सण पाळावा. वर्षाच्या अखेरीस तू आपल्या श्रमाच्या फळांचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळावा.
“इस्राएल लोकांस सांग: मी तुम्हास देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल व हंगामाच्या वेळी कापणी कराल त्यावेळी पिकाच्या पहिल्या उपजातील पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी;
धान्य, नवीन द्राक्षरस व तेल या आपल्या उत्पन्नातील पहिला वाटाही त्यांना द्यावा. तसेच मेंढरांची पहिल्यांदा कातरलेली लोकरही लेवींना द्यावी.
आमच्या शेतातले पहिले पीक आणि निरनिराळ्या फळझाडांची प्रथमफळे दरवर्षी परमेश्वराच्या मंदिरात आणण्याचे हे आम्ही वचन देतो.
पण मी, माझ्याकरिता खास द्राक्षवेली म्हणून खरे बीज असे तुला लावले, तर आता तू बदलून माझ्यासाठी विश्वासघातकी अशा परक्या जातीच्या द्राक्षवेलीप्रमाणे झाली आहे.
आणि जैतुनाचे काही फाटे जर तोडले गेले आणि तू रानटी जैतून असता, त्यामध्ये कलम करून जोडला गेलास आणि तू त्या जैतुनाच्या पौष्टीकतेच्या मुळात जर सहभागी झालास
आपण त्याच्या निर्मीती मधील जसे काय प्रथमफळ व्हावे म्हणून त्याने सत्यवचनाद्वारे स्वतःच्या इच्छेने आपणाला जन्म दिला.