वाईट कृत्ये करणे सोडून दे आणि चांगली कृत्ये कर. शांतीचा शोध कर आणि तिच्यामागे लाग.
TSK
TSK · रोम 14:19
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
‹जे शांती करणारे ते धन्य आहेत, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.›
शक्य असल्यास सर्व लोकांशी तुम्ही आपल्याकडून शांतीने रहा.
पण स्वतः विश्वास ठेवत नसल्यामुळे कोणी सोडून जात असेल तर जाऊ द्या; कारण कोणी बंधू किंवा बहीण अशा बाबतीत बंधनात नाही. पण देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरिता बोलावले आहे.
नक्की तेच तुम्हासही लागू पडते जर तुम्ही आध्यात्मिक दाने मिळवता म्हणून उत्सुक आहात तर मंडळीच्या उन्नतीसाठी, मंडळीला आध्यात्मिक मजबूती येण्यासाठी जोरदार प्रयत्न करा.
¶ तुम्हास इतका वेळ वाटत असेल की आम्ही तुमच्यापुढे आमचे समर्थन करीत आहोत, आम्ही देवासमोर ख्रिस्ताच्या ठायी बोलत आहो आणि प्रियांनो या सर्व गोष्टी तुमच्या उन्नतीसाठी आहेत.
शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत चांगले ते करा.
¶ ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करूणा ही जर आहेत,
¶ म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकांची उभारणी करा; हे तुम्ही करतही आहात.
¶ पण तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि जे प्रभूला शुद्ध अंतःकरणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात, अशांच्या बरोबर, नीतिमत्त्व, विश्वास, प्रीती आणि शांती यांच्यामागे लाग.
¶ तुमच्यात ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने चांगल्या आचरणातून, ज्ञानीपणाच्या सौम्यतेने, आपल्या स्वतःची कृती दाखवावी.