TSK

TSK · रोम 4:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तेव्हा फारोने अब्रामास बोलावले. तो म्हणाला, “तू हे माझ्याबाबत का केलेस? साराय तुझी पत्नी आहे हे तू मला का सांगितले नाहीस?

मग अबीमलेखाने अब्राहामास बोलावून त्यास म्हटले, “तू हे आम्हांला काय केले? मी तुझ्याविरूद्ध काय पाप केले की तू माझ्यावर आणि माझ्या राष्ट्रावर असे मोठे पाप आणले? तू माझ्याशी करू नये ते केले आहे अशा गोष्टी तू करायच्या नव्हत्या.”

परमेश्वर म्हणतो, “शहाण्यांनी त्यांच्या शहाणपणाबद्दल, बलवानांनी त्यांच्या बळाबद्दल व श्रीमंतांनी त्यांच्या पैशाबद्दल अभिमान बाळगू नये.”

कारण देवाच्या दृष्टीपुढे नियमशास्त्राच्या कृतींकडून कोणीही मनुष्य नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राकडून पापाचे ज्ञान होते.

यासाठी की कोणाही मनुष्याने देवासमोर बढाई मारू नये.

¶ कारण तुझ्यात व दुसऱ्यात फरक पाहतो तो कोण आहे? आणि तुला मिळाले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? ज्याअर्थी तुला सर्व मिळाले आहे, तर तुला मिळाले नाही अशी बढाई का मारतोस?

कारण तुमच्याजवळ आम्ही आमची पुन्हा प्रशंसा करीत नाही, पण तुम्हास आमच्या बाबतीत अभिमानाला कारण देतो; म्हणजे, मनुष्याच्या अंतःकरणाविषयी नाही, पण त्याच्या बाहेरच्या स्थितीविषयी जे अभिमान मिरवतात त्यांच्यासाठी तुमच्याजवळ काही उत्तर असावे.

¶ जर मला अभिमान बाळगायचा असेल तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टीविषयी अभिमान बाळगीन.

तरी त्याऐवजी, नियमशास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले, या उद्देशासाठी की, विश्वास ठेवणार्‍यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे.

आपल्या कर्मामुळे हे झाले नाही यासाठी कोणी बढाई मारू नये.