TSK

TSK · जख 3:4

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

इकडे परमेश्वराचे म्हणणे काय आहे ते मीखाया सांगतच होता. मीखाया म्हणाला, “ऐका परमेश्वर काय म्हणतो: ते पाहा परमेश्वर स्वर्गात सिंहासनावर बसलेला मी पाहिला. आकाशातले त्याचे सर्व सैन्य त्याच्या शेजारी उभे आहे.

माझ्या पापांकडे बघू नकोस, माझ्या सर्व अपराधांचे डाग पुसून टाक.

तेव्हा मी म्हणालो, “मला हाय हाय आहे! कारण मी आता मरणार आहे. कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे, आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो, कारण माझ्या डोळ्यांनी राजाला, परमेश्वरास, सेनाधीश परमेश्वरास पाहीले आहे.”

मी, होय! मी आपल्यासाठी तुझी पापे पुसून टाकतो; तो मी, मीच आहे, आणि तुझी पातके यापुढे मी लक्षात ठेवणार नाही.

सियोने, जागी हो, जागी हो, आपली शक्ती धारण कर, यरूशलेमे, पवित्र नगरी, तुझी सुंदर वस्त्रे परिधान कर. कारण यापुढे सुंता न झालेला व अपवित्र असा कोणी पुन्हा तुझ्यामध्ये येणार नाही.

मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव अतीशय आनंदीत होतो. कारण जसा पती फेटा घालून आपणाला सुशोभित करतो, आणि नवरी जशी अलंकाराणे स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाचे वस्रे नेसवली आहेत, मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे.

मग तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडेल तेव्हा तुम्ही तुमच्या सर्व अशुद्धतेपासून तुम्ही शुद्ध व्हाल. आणि मी तुम्हास तुमच्या सर्व मूर्तीपासून शुद्ध करीन.

¶ देवदूताने मला दाखवले, मुख्य याजक यहोशवा परमेश्वराच्या दूतापुढे उभा होता आणि सैतान त्यास दोष करण्यासाठी त्याच्या उजवीकडे उभा होता.

आता मी यहोशवापुढे ठेवलेला दगड पाहा. या एका दगडाला सात बाजू आहेत, आणि मी त्यावर एक शिलालेख कोरीन. ‘हा सेनाधीश परमेश्वर आहे’ आणि मी एका दिवसात या देशातील अधर्म नाहीसा करीन.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

‹परंतु पिता आपल्या नोकरांस म्हणाला, त्वरा करा, चांगला झगा आणून त्यास घाला. त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला.›

पण हे देवाचे नीतिमत्त्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, विश्वास ठेवणार्‍या सर्वांसाठी आहे कारण तेथे कसलाही फरक नाही.

आणि तुम्ही कित्येकजण तसे होता; पण तुम्ही धुतले गेला आहा, तुम्ही पवित्र केले गेला आहात आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने व आपल्या देवाच्या आत्म्याकडून तुम्ही नीतिमान ठरवले गेला आहात.

कारण ख्रिस्तात तुम्हामधील जितक्यांचा बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे.

आणि जो नवा मनुष्य, आपल्या निर्माण करणार्‍याच्या प्रतिरूपानुसार पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्यास तुम्ही परिधान केले आहे.

¶ मग मी पाहिले राजासन आणि, चार जिवंत प्राणी व वडीलजन यांच्यासभोवती अगणित देवदूतांची वाणी ऐकली, त्यांची संख्या अयुतांची अयुते व हजारो हजार होती.

या, आपण आनंद करू, हर्ष करू, आणि त्यास गौरव देऊ; कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे, आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे.