TSK

TSK · 1 इति 10:13

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ सल्लामसलत विचारण्यासाठी पंचाक्षऱ्याकडे किंवा चेटक्याकडे जाऊ नका; त्यांच्यामागे लागू नका; ते तुम्हास अशुद्ध करतील. मी तुमचा देव परमेश्वर आहे!

आपल्या पोटच्या मुलाबाळांचा वेदीवर बली देऊ नका. ज्योतिषी, चेटूक करणारा, शकुनमुहर्त पाहणारा, मांत्रिक यांच्या नादी लागू नका.

सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो, इस्राएल मिसरातून वर येत असता अमालेकाने त्यास काय केले, म्हणजे तो वाटेवर त्याच्याविरुध्द कसा उभा राहिला हे मी पाहिले आहे.

कारण बंडखोरी जादुगीरीच्या पापासारखी आहे आणि हट्ट हा दुष्टपणा, मूर्तीपूजा व घोर अन्याय, मूर्ती करणे यासारखा आहे. तू परमेश्वराचे वचन नाकारले यामुळे राजा म्हणून त्याने तुला नाकारले आहे.”

मग शौलाने वेष पालटून निराळी वस्त्रे अंगात घातली आणि तो आपणाबरोबर दोन माणसे घेऊन त्या स्त्रीकडे रात्री गेला आणि त्याने तिला म्हटले, “तुझ्या भूतविद्येने मी तुला सांगेन त्यास माझ्यासाठी वर आण.”

तुझ्या विश्वासणाऱ्याची कधी निराशा होत नाही. परंतु जे कारण नसताना विश्वासघात करतात, ते लाजवले जातील.

परंतु दुष्टांना त्यांच्या वतनातून छेदून टाकले जाईल, आणि जे विश्वासहीन त्यांना त्यांच्या वतनापासून दूर नेले जाईल.

¶ शिमोन नावाचा मनुष्य त्या नगरात राहत होता, तो जादूचे प्रयोग करीत असे; त्याच्या प्रयोगामुळे शोमरोन प्रांतातील लोक आश्चर्यचकित होत असत, तो स्वतःला फार मोठा समजत असे.