TSK

TSK · 1 इति 20:3

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

अशाप्रकारे त्यांनी इस्राएल लोकांचे जीवन फारच कठीण काबाडकष्टांचे व हाल अपेष्टांचे केले; त्यांनी त्यांना विटा बनविण्याची, बांधकामासाठी चुना बनविण्याची तसेच शेतीची व इतर अतिशय कठीण व कष्टाची कामे बळजबरीने करायला लावली.

तेव्हा सुक्कोथाचे अधिकारी म्हणाले, काय, जेबह व सलमुन्ना यांच्यावर तू आधीच मात केली आहेस काय? आम्हास माहीत नाही आम्ही तुझ्या सैन्याला भाकर का द्यावी?

राब्बा नगरातील लोकांसही त्याने बाहेर नेले त्यांना कुऱ्हाडी, करवती, लोखंडी दाताळी यांनी काम करायला ठेवले. त्यांच्याकडून जबरदस्तीने वीट कामही करून घेतले. सर्व अम्मोनी नगरांमध्ये दावीदाने असेच केले. नंतर दावीद आपल्या सैन्यासह यरूशलेमेला परतला.

दावीदाने म्हणाला, “नाहाशाचा पुत्र हानून याच्यावर मी दया करीन. कारण त्याच्या पित्याने माझ्यावर दया केली होती.” असे म्हणून दावीदाने हानूनच्या सांत्वनेसाठी आपले दूत अम्मोनी लोकांच्या देशी पाठवले.