TSK

TSK · 1 इति 24:3

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ दावीद नोब शहरात अहीमलेख याजकाजवळ आला आणि अहीमलेख कापत कापत दावीदाला भेटायला आला व त्यास म्हणाला, “तू एकटा का आलास आणि तुझ्याबरोबर कोणी का नाही?”

अहीटूबाचा मुलगा सादोक आणि अब्याथारचा मुलगा अहीमलेख हे याजक होते. सराया कार्यवाह होता.

यवाबाच्या जागी राजा शलमोनाने यहोयादाचा पुत्र बनायाची सेनापती म्हणून नेमणूक केली आणि अब्याथाराच्या जागी मुख्य याजक म्हणून सादोकाची केली.

¶ अहरोनाचे वंशज असे मोजले, अहरोनाचा पुत्र एलाजार. एलाजाराचा पुत्र फिनहास. फिनहासचा पुत्र अबीशूवा.

¶ दावीदाने मग सादोक आणि अब्याथार याजकांना बोलावले. आणि तसेच उरीएल, असाया, योएल, शमाया, अलीएल आणि अमीनादाब या लेवींनाही बोलावून घेतले.

अहीटूबचा पुत्र सादोक आणि अब्याथारचा पुत्र अबीमलेख याजक होते. शवूशा हा नियमशास्त्र शिक्षक होता.

राजा दावीद, सादोक, अहीमलेख आणि याजक व लेवी घराण्यातील प्रमुख यांच्यासमोर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. घराण्यातील श्रेष्ठ मुलाने कनिष्ठाबरोबर चिठ्ठ्या टाकल्या. त्यांनी अहरोन याच्या वंशजाप्रमाणेच चिठ्ठ्या टाकल्या.