तेव्हा परमेश्वराने निवड केलेल्या व्यक्तीची तुम्ही राजा म्हणून नेमणूक करा. राजा हा तुमच्यापैकीच असला पाहिजे, परदेशी असता कामा नये.
TSK
TSK · 1 इति 28:5
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
महाराज, आता सर्व इस्राएल लोकांचे तुमच्याकडे लक्ष लागले आहे. स्वत:नंतर तुम्ही कोणाला राजा म्हणून घोषित करता याची ते वाट बघत आहेत.
मग त्यास घेऊन माझ्याकडे या. तो या राजासनावर बसेल आणि राजा म्हणून माझी जागा घेईल. इस्राएल आणि यहूदाचा अधिकारी व्हावा म्हणून मी शलमोनला निवडले आहे.
ही दावीदाची मुले होती, त्यामध्ये त्याच्या उपपत्नीपासून झालेल्या पुत्रांचा नावाचा उल्लेख केलेला नाही. तामार ही त्यांची बहिण होती.
मी त्यास माझ्या घरात आणि राज्यात सर्वकाळ ठेवीन, त्याचे राजासन सर्वकाळ स्थापीन.
¶ आता दावीद म्हातारा झाला होता आणि त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात होता, तेव्हा त्याने आपला पुत्र शलमोन याला इस्राएलाचा राजा केले.
त्यानंतर परमेश्वराच्या राजासनावर शलमोन स्थानापन्न झाला. शलमोनाने आपला पिता दावीदाची जागा घेतली. राजा म्हणून तो यशस्वी ठरला. इस्राएलचे सर्व लोक शलमोनाचे आज्ञापालन करत.
शलमोन परमेश्वरास म्हणाला, “माझे पिता दावीद यांच्यावर तुझी फार कृपादृष्टी होती, त्यांच्या जागी तू मला राजा म्हणून निवडलेस.
हे देवा, तू राजाला आपले न्यायाचे निर्णय, राजाच्या मुलाला आपले न्यायीपण दे.