TSK

TSK · 1 योहा 2:28

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

पण परमेश्वराकडून इस्राएल सर्वकाळच्या तारणाने तारला जाईल; तुम्ही पुन्हा कधीही लज्जित किंवा अपमानीत होणार नाही.

“पाहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येईल त्यापूर्वी मी एलीया संदेष्ट्याला तुमच्याकडे पाठवीन. देवाच्या न्यायदानाच्या भयंकर मोठ्या वेळेपूर्वी तो येईल.

कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘बघा, मी सियोनात एक अडखळण्याचा दगड, एक अडथळ्याचा खडक ठेवतो. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.’

पण प्रत्येकजण त्याच्या क्रमानुसार, ख्रिस्त जो प्रथमफळ आहे आणि मग ख्रिस्त येण्याच्या वेळी त्याचे असलेले लोक जिवंत केले जातील.

कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या समक्षतेत, त्याच्या येण्याच्या वेळेस आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुकुट काय आहे? तुम्हीच आहात ना?

¶ आणि स्वतः शांतीचा देव तुम्हास पूर्ण पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे येणे होईल तेव्हा तुमचा आत्मा, जीव आणि शरीर पूर्ण निर्दोष राहो.

आता पुढे माझ्यासाठी जो नितीमत्वाचा मुकुट ठेवला आहे, तो त्यादिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल आणि केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल.

तसाच ख्रिस्त हि, पुष्कळांची पापे वाहून नेण्यास एकदाच अर्पिला गेला आणि त्याची वाट पाहणाऱ्यांस पापासंबंधात नव्हे तर तारणासाठी दुसऱ्याने दिसेल.

आणि मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तेव्हा तुम्हास गौरवाचा न कोमेजणारा मुकुट मिळेल.

¶ माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करू नये यासाठी मी तुम्हास या गोष्टी लिहीत आहे, पण जर तुम्हांपैकी एखादा पाप करतो तर त्याच्यासाठी पित्याजवळ आपला कैवारी येशू ख्रिस्त जो नीतिमान तो आहे.

¶ प्रिय मित्रांनो, वाईट करण्याबद्दल जर आमची अंतःकरणे आम्हास दोष देत नाहीत तर देवाकडे जाण्यासाठी आम्हास धैर्य आहे.

¶ आणि आम्हास देवामध्ये धैर्य आहे की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल.