फारो व मिसरी सैन्य आपणाकडे येताना इस्राएल लोकांनी पाहिले, तेव्हा ते अतिशय घाबरले; आणि मदतीसाठी ते परमेश्वराचा धावा करू लागले.
TSK
TSK · 1 शमु 13:6
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
तेव्हा मिद्यानाने इस्राएलावर अधिकाराने जुलूम केला; मिद्यान्यांमुळे इस्राएलाच्या लोकांनी आपल्यासाठी डोंगरातील भुयारे, गुहा व किल्ले यांचा आश्रय घेतला.
नंतर इस्राएली सैन्य मागे उलटून त्यांच्यावर हल्ला चढवला. बन्यामिनी माणसे फार घाबरली, कारण त्यांनी पाहिले की, आपल्यावर अरिष्ट आले आहे, हे त्यांच्या लक्षात आले.
जीफी लोक शौलाकडे गिबा येथे येऊन म्हणाले, “यशीमोनाच्या दक्षिणेकडे हकीला डोंगरातील झाडीत गडामध्ये दावीद आम्हाजवळ लपून राहिला आहे की नाही?
इस्राएलांची माणसे पळाली आणि शौल व त्याचे पुत्र मरण पावले, हे इस्राएलाची माणसे खोऱ्याच्या पलीकडे व यार्देनेच्या पलीकडे होती त्यांनी पाहिले; तेव्हा ती आपली नगरे सोडून पळाली; मग पलिष्टी येऊन त्यामध्ये राहिले.
पण हे लोक लुटलेले आणि लुबाडलेले आहेत; ते सर्व खड्ड्यामध्ये सापळ्यात पडलेले आहेत, तुरुंगात कैदी झाले आहेत; ते सर्व लूट असे झाले आहेत त्यांना सोडवणारा कोणी नाही आणि त्यांना परत माघारी म्हणणारा कोणी नाही!
जग त्यांच्यासाठी लायक नव्हते ते रानांमधून, डोंगरांमधून, गुहांमधून व जमिनीमधील खंदकामधून फिरत राहिले.