आता खंबीर राहा आणि धैर्याने वागा. आपला स्वामी शौल मरण पावला असला तरी यहूदा वंशातील लोकांनी माझा राज्याभिषेक केला आहे.”
TSK
TSK · 2 इति 18:16
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
तेव्हा मीखायाने सांगितले, “काय होणार ते मला दिसते आहे. इस्राएलाचे सैन्य डोंगरांवर इतस्तत: पसरेल. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी त्यांची अवस्था होईल. परमेश्वराचे म्हणणे असे आहे, ‘यांना कोणी नेता नाही. यांनी सुखरूप घरी जावे. लढाईच्या भानगडीत पडू नये.”
तुमच्याकडे शस्त्रास्त्रे आहेत. तुम्ही ज्या मुलाची निवड कराल तो उत्तम व योग्य असेल त्यास त्याच्या वडिलाच्या सिंहासनावर बसवा. मग आपल्या धन्याच्या घराण्यासाठी लढा द्या.”
¶ “जे मेंढपाळ माझ्या कुरणातून मेंढरांचा नाश आणि त्यांची पांगापंग करीत आहेत,” त्यांना हाय हाय! परमेश्वर असे म्हणतो,
प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जसा मी जिवंत आहे; माझी मेंढरे लुटीस गेली आहेत; कारण तेथे त्यांना मेंढपाळ नव्हता ती वनपशूस भक्ष्य झाली आणि माझ्या मेंढपाळांनी कोणीही कळपाला शोधले नाही परंतु मेंढपाळाने स्वतःची काळजी घेतली आणि माझ्या कळपाला चारले नाही.
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “हे तलवारी, माझ्या मेंढपाळांवर प्रहार कर व माझ्या मित्रावर वार कर; मेंढपाळावर वार कर म्हणजे मेंढरे पळून जातील आणि मी त्या लहान जीवांना शिक्षा करीन.
येशू त्यांना म्हणाला, ‹“होय, मी आहे. जसे तू म्हणालास. तरी मी तुम्हास सांगतोः यापुढे मनुष्याच्या पुत्राला तुम्ही सामर्थ्याच्या उजवीकडे बसलेले व आकाशातून येताना पाहाल.”›