TSK

TSK · 2 इति 25:23

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

या लोकांनी यहूदावर स्वारी केली आणि त्यांनी राजाच्या महालातली सगळी घनदौलत लुटून नेली. यहोरामाच्या पत्नी-अपत्यानाही त्यांनी पळवून नेले. फक्त यहोआहाज हा सगळ्यात धाकटा पुत्र तेवढा बचावला.

तो हजाएलाशी रामा येथे लढताना अरामी लोकांच्या हातून जे घाय त्यास झाले होते ते बरे व्हावेत म्हणून तो इज्रेल येथे गेला. अहाबाचा पुत्र यहोराम हा इज्रेल येथे आजारी होऊन पडला होता म्हणून यहूदाचा राजा यहोराम ह्याचा पुत्र अजऱ्या त्याच्या समाचारास गेला.

तेव्हा अश्शूरच्या राजाच्या सेनापतीकरवी परमेश्वराने यहूदावर हल्ला केला. या सेनापतींनी मनश्शेला आकड्यांनी जखडून पकडले. त्याच्या हातात पितळी बेड्या ठोकल्या. अशा रीतीने मनश्शेला कैद करून त्यांनी बाबेलला नेले.

राजा नबुखद्नेस्सरने वर्षारंभी काही सेवक पाठवून यहोयाखीनाला परमेश्वराच्या मंदिरातील बहुमोल खजिन्यासह बाबेलला आणवले. यहोयाखीनाच्या वडिलांचा भाऊ सिद्कीया याला नबखद्नेस्सरने यहूदा व यरूशलेमचा राजा केले.

मग ते पुढील वेशींवरुन गेले. एफ्राईमाची वेस जुनी वेस, मत्स्यवेस. हनानेल बुरूज आणि हमया बुरूज यांच्यावरुन ते पुढे गेले. मेंढरांच्या वेशीपर्यंत जाऊन पहाऱ्याच्या वेशीजवळ ते थांबले.

गर्व मनुष्यास खाली आणतो, पण जो कोणी विनम्र आत्म्याचा असतो त्याचा आदर होतो.

आता मी, नबुखद्नेस्सर, स्वर्गीय राजास गौरव देवून त्याची खूप स्तुती करतो, कारण त्याची सर्व कामे सभ्यतेची आणि त्याचे मार्ग न्यायाचे आहेत. जे गर्वाने चालतात त्यास तो नम्र करतो.

‹कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.”›