TSK

TSK · 2 इति 28:2

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तुम्ही मूर्तीपूजा करु नका, आपल्यासाठी ओतीव देव करु नका. मी तुमचा देव परमेश्वर आहे!

परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बआल आणि अष्टारोथ यांची उपासना केली;

स्मृतीस्तंभ त्यांनी उखडून टाकले आणि बआलाची देऊळ जाळले.

अहज्याची वागणूकही अहाबाच्या घराण्याप्रमाणेच होती. कारण अहज्याच्या आईने त्यास दुराचरण करण्यास प्रवृत्त केले.

तसेच त्यांची संपूर्ण भूमी मूर्तींनी भरलेली आहे; ते स्वहस्ते बनविलेल्या कलाकृतीची, स्वतःच्या बोटांनी बनविलेल्या गोष्टीची पूजा करतात.

तिने बआलास धूप दिला, आणि नथ व दागिने घालून स्वत: नटली. मला विसरून आपल्या प्रियकरांमागे गेली म्हणून मी तिला शिक्षा करीन असे परमेश्वर म्हणतो.

ह्याला सर्वांचे कारण याकोबचे पाप, तसेच इस्राएलाच्या घराण्याची दुष्कर्मे आहेत. याकोबाच्या बंड खोरीचे कारण काय? त्यास कारणीभूत शोमरोनच आहे की नाही? यहूदाची उंचस्थाने कोणती आहेत? ती यरूशलेमच आहेत की नाही?