TSK

TSK · 2 इति 31:4

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ भूमीच्या सर्व उत्पन्नाचा एक दशांश भाग म्हणजे, शेतातील सर्व उपज, आणि झाडे, वेली यांची फळे ह्यांचा एक दशांश भाग परमेश्वराकरिता पवित्र आहे.

तू लेवी लोकांशी बोल आणि त्यांना सांग: इस्राएल लोकांचे जे दशमांश तुमचे वतन म्हणून तुम्हास नेमून दिले आहेत, तो दहावा भाग लेवी लोकांचा असेल. पण त्याचा दहावा भाग तू परमेश्वरास अर्पण केला पाहिजेस.

लेवी घराण्याच्या इतिहासात ज्यांची नावे नोंदलेली होती असे, तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे जे लेवी पुरुष परमेश्वरच्या मंदिरात नेमून दिलेल्या दैनंदिन कामासाठी जात त्यांना त्यांची वाटणी हे मदतनीस देत. अशा प्रकारे लेवीच्या प्रत्येक गटाला काम नेमून दिलेले होते.

¶ त्यानंतर यहूदातील सर्व लोकांनी पिकाचा एक दशांश वाटा, नवीन द्राक्षरस आणि तेल मंदिरात आणले. या सगळया गोष्टी कोठारात ठेवण्यात आल्या.

मनुष्य देवाला लुटणार काय? तरीही तुम्ही मला लुटता. पण तुम्ही असे म्हणता, ‘आम्ही तुझे काय लुटले आहे?’ तुम्ही दशमांश व अर्पणे यांविषयी मला लुटता.

कारण, मोशेच्या नियमशास्त्रात लिहिले आहे की, ‘मळणी करीत असलेल्या बैलाला मुसके घालू नको.’ देव केवळ बैलांची काळजी करतो काय?