TSK

TSK · 2 इति 32:33

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

इस्राएलाच्या सर्व लोकांस अहरोन मरण पावला हे कळले. म्हणून त्यांनी तीस दिवस दुखवटा पाळला.

यामुळे इस्राएलांचा परमेश्वर म्हणतो, की तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालेल असे मी म्हटले खरे; परंतु आता परमेश्वर असे म्हणतो, ही गोष्ट माझ्यापासून दूर होवो कारण जे माझा आदर करतात त्यांचा आदर मी करीन आणि जे मला तिरस्कार करतात त्यांचा अवमान होईल.

नाहीतर माझे स्वामी राजे आपल्या वाडवडिलांसारखे झोपल्यावर, मी आणि शलमोन लोकांच्या दृष्टीने गुन्हेगार ठरु.”

मग शलमोन मरण पावला तेव्हा त्याच्या पूर्वजांशेजारी दावीद याच्या नगरामध्ये त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या ठिकाणी रहबाम राज्य करू लागला.

¶ मनश्शे यहूदाचा राजा झाला तेव्हा बारा वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेमध्ये पंचावन्न वर्षे राज्य केले.

नितीमानाची जेव्हा आपण आठवण करतो, तेव्हा ते आपणास आनंदित करते; पण वाईट करणाऱ्याचे नाव नष्ट होते.