TSK

TSK · 2 इति 9:23

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

राजाचा हा न्याय इस्राएल लोकांच्या कानावर गेला. राजाच्या चाणाक्षपणाबद्दल त्यांना भय वाटले. योग्य निर्णय घेण्याचे परमेश्वराचे शहाणपण त्याच्याकडे आहे हे त्यांच्या लक्षात आले.

या लोकांस उचित मार्गाने नेण्यासाठी मला शहाणपण आणि ज्ञान दे, तुझ्या एवढ्या बहुसंख्य लोकांवर राज्य करणे कोणाला जमणार?”

कारण परमेश्वर ज्ञान देतो, त्याच्या मुखातून सुज्ञता आणि ज्ञान येतात.

त्यादिवशी, इशायाचे मूळ लोकांसाठी ध्वज निशानी असे उभे होईल. राष्ट्रे त्यास शोधून काढतील, आणि त्याचे विश्रामस्थान वैभवशाली होईल.

तो समय आणि ऋतु बदलतो, तो राजास काढतो आणि दुसऱ्यास सिंहासनावर बसवून राजे करतो; तो ज्ञान्यास आणि विवेकवंतास शहाणपण देतो.

‹कारण मी तुम्हास असे शब्द व अशी बुद्धी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुध्द बोलायला मुळीच जमणार नाही.›

कारण एकाला आत्म्याच्याद्वारे ज्ञानाचे वचन मिळते, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या इच्छेप्रमाणे विद्येचे वचन दिले जाते.

¶ म्हणून जर तुमच्यातील कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने देवाकडे मागावे म्हणजे ते त्यास मिळेल कारण तो दोष न लावता सर्वांस उदारपणे देतो.

पण जे ज्ञानीपण वरून येते ते प्रथम शुद्ध, त्याशिवाय शांतीशील, सहनशील आणि विचारशील असते. ते दयेने व चांगल्या फळांनी भरलेले असते; ते निःपक्षपाती व निर्दोष असते.