TSK

TSK · 2 योहा 1:3

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुम्ही चौथ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या महिन्याच्या विशिष्ट दिवशी शोक प्रकट करता, उपवास करता. ते यहूदाच्या घराण्यास छान, आनंदाचे, मोठ्या चांगुलपणाचे दिवस होतील. म्हणून तुम्ही सत्य आणि शांती ह्यावर प्रेम केलेच पाहिजे.”

ख्रिस्त येशूमध्ये सुंता काही कामाची नाही आणि सुंता न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही; तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे.

परंतु विश्वास आणि प्रीती जी ख्रिस्त येशूमध्ये सापडते ती आपल्या प्रभूच्या कृपेने ओसंडून वाहिली.

जो कोणी पुत्राला नाकारतो त्यास पिता लाभत नाही पण जो पुत्राला स्वीकारतो त्यास पिता लाभला आहे.

¶ वडिलांकडून देवाने निवडलेली स्त्री कुरिया व तिच्या मुलांना, सत्यात सहभागी असलेल्या लोकांप्रमाणे ज्यांच्यावर मी प्रीती करतो आणि तुमच्यावर प्रीती करणारा मी एकटाच नाही, तर ज्यांची सत्याशी ओळख झाली आहे असे इतर सर्वजणसुद्धा प्रीती करतात. या सत्यामुळे जे आमच्यामध्ये असते, ते आमच्यामध्ये सर्वकाळ राहील.