TSK

TSK · 2 राजे 21:3

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

म्हणजे आज्ञांचे उल्लघंन करून ते सूर्य, चंद्र, किंवा आकाशातील तांरागण इतर दैवतांची पूजा करू लागले,

तेव्हा एलीया सर्व लोकांजवळ येऊन म्हणाला, “तुम्ही कोठवर आपले मन बदलत राहणार? जर परमेश्वर खरा देव असेल तर त्यास अनुसरा. पण बआल खरा देव असेल तर त्यास अनुसरा.” लोक यावर एका शब्दानेही त्यास उत्तर देऊ शकले नाही.

पण इस्राएलच्या इतर राजाप्रमाणेच यहोराम वागला. परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये त्याने केली. अहाबाच्या घरचे लोक वागत तसाच तो वागला. त्याची पत्नी अहाबाची मुलगी होती.

¶ येहूने मग सर्वांना एकत्र बोलावले. त्यांना तो म्हणाला, “अहाबाने बआलाची थोडी सेवा केली. पण येहू मात्र त्याची बरीच सेवा करणार आहे.

आणि त्यांनी परमेश्वर आपला देव याच्या सर्व आज्ञा सोडून, त्यांनी वासरांच्या दोन मूर्ती केल्या, अशेराचे खांब उभारले, आणि आकाशातील सर्व ताऱ्यांची आणि बआलदेवतेची त्यांनी पूजा केली.

¶ तू कदाचित् असे म्हणशील, आम्ही परमेश्वर देवावर भरवसा ठेवतो. पण हिज्कीयाने परमेश्वराची उंचस्थाने आणि वेद्या काढून टाकल्या आणि यहूदा व यरूशलेमेला म्हटले की, फक्त यरूशलेममधील याच वेदीपुढे आराधना करावी तोच तो आहे की नाही?

पण त्यानेच परमेश्वराची उंचस्थाने आणि वेद्या काढून टाकल्या. तुम्हा यहूदी आणि यरूशलेमेच्या लोकांस त्याने सांगितले की तुम्ही फक्त एकाच वेदीवर उपासना केली पाहिजे आणि धूप जाळला पाहिजे.

¶ आपल्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षीच तो आपला पूर्वज दावीद याच्या परमेश्वराच्या भजनी लागला. योशीयाने लहान वयातच हा मार्ग पत्करला आणि कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी यहूदा आणि यरूशलेमेला शुद्ध केले, उंचस्थाने, अशेरा देवीचे खांब, कोरीव आणि ओतीव मूर्ती यांची मोडतोड केली.

“पण तुम्ही जे परमेश्वराचा त्याग करता, माझ्या पवित्र डोंगराला विसरता, जे तुम्ही गादासाठी मेज तयार करता आणि मनीसाठी मिश्रित मद्याचे प्याले भरून ठेवता.