तर आज मी तुम्हास सावध करत आहे; याला स्वर्ग आणि पृथ्वी साक्षी आहेत, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही यार्देन नदी ओलांडून जात आहात तेथून तुमचा लवकरच अगदी नायनाट होईल; तेथे तुम्ही फार दिवस राहणार नाहीत, पण तुमचा समूळ नाश होईल.
TSK
TSK · 2 राजे 25:21
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
परमेश्वर तुम्हास पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्व लोकांमध्ये विखरुन टाकील. तेथे तुम्ही काष्ठपाषाणाच्या मूर्तीची उपासना कराल. तुम्हास आणि तुमच्या पूर्वजांना माहीत नसलेल्या परकीय देवांची उपासना कराल.
जर लोकांच्या हातून तुझ्याविरूद्ध काही पाप घडले, (कारण पाप करत नाही असा कोणीच नाही) अशावेळी त्यांच्यावर संतापून तू त्यांचा शत्रूकडून पराभव करवशील. शत्रू मग त्यांना कैदी करून दूरदेशी नेतील.
अखेर परमेश्वराने आपले सर्व सेवक जे भविष्यवादी होते त्यांच्या द्वारे सांगितल्याप्रमाणे इस्राएलास आपल्या समोरून घालवले. त्यांना त्यांच्या प्रदेशातून काढून अश्शूरमध्ये नेण्यात आले. आजपर्यंत ते तेथे आहेत.
यहोयाखीनाला नबुखद्नेस्सरने बाबेलला कैदी म्हणून नेले. राजाची आई, स्त्रिया, सेवक, आणि गावातील प्रतिष्ठित लोक यांनाही यरूशलेमेत त्याचे कैदी होते.
मी त्यांना एक भयावह गोष्ट बनवीन, मी त्यांना सर्व मानवजातीच्या दृष्टीत अरिष्ट असे करीन, ते जीथे घालवले जातील तीथे ते चेष्टेचा व निंदा, म्हण व शाप असे होतील.
परमेश्वराने आपल्या समोरून त्यांना विखरले आहे, तो पुन्हा त्याच्याकडे पाहणार नाही, याजकांची मर्यादा त्यांनी राखली नाही. त्यांनी वडिलांचा मान राखला नाही.
¶ मी परमेश्वर देव असे जाहीर करतो हे असे घडेलच व ते मी करेलच, मी कडक धोरण सोडून देईन, तुझे मार्ग आणि तुझे कार्य हेच तुझा न्याय करतील; असे परमेश्वर देव जाहीर करत आहे.