TSK

TSK · 2 पेत्र 1:4

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

मग तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडेल तेव्हा तुम्ही तुमच्या सर्व अशुद्धतेपासून तुम्ही शुद्ध व्हाल. आणि मी तुम्हास तुमच्या सर्व मूर्तीपासून शुद्ध करीन.

ते इस्राएली आहेत; त्यांच्यासाठी दत्तकपण, गौरव, करार, नियमशास्त्र, उपासना आणि वचने आहेत.

पण आपल्या तोंडावर आच्छादन नसून आपण सर्वजण, जणू आरशात पाहिल्याप्रमाणे, प्रभूच्या तेजाकडे पाहत असता, कलेकलेने त्याच्या प्रतिरूपात आपले रूपांतर होत आहे. हे प्रभूच्या आत्म्याकडून होत आहे.

आता, जी वचने अब्राहामाला व त्याच्या संतानाला दिली होती. तो ‘संतानांना’ असे अनेकाविषयी म्हणत नाही, पण ‘तुझ्या संतानाला’ असे एकाविषयी म्हणतो आणि तो एक ख्रिस्त आहे.

यासाठी तुम्ही आत्म्याद्वारे मनात नवे केले जावे,

परंतु आता ज्या कराराचा मध्यस्थ ख्रिस्त आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे, जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे, तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा त्यास मिळाली आहे.

आमच्या मानवी वडिलांनी त्यांच्या दृष्टीने अती उत्तम अशी शिस्त थोड्या काळासाठी लावली. पण देव आम्हास आमच्या चांगल्यासाठी शिस्त लावतो, यासाठी की, त्याच्या पवित्रपणात आपणही वाटेकरी व्हावे.

म्हणून अशा मनुष्याने आपल्या देहातील पुढील आयुष्य, मनुष्यांच्या वासनांसाठी नाही, पण देवाच्या इच्छेसाठी जगावे.

कारण जेव्हा, चुकीने वागणार्‍या लोकांमधून कोणी बाहेर निघाले असतील, तेव्हा हे लोक मूर्खपणाच्या, मोठ्या, फुगीर गोष्टी बोलून, त्यांना देहाच्या वासनांद्वारे कामातुरपणाने भूरळ घालतात.

आणि देवाने आम्हास जे देण्याचे अभिवचन दिले आहे ते म्हणजे सार्वकालिक जीवन होय.