जेव्हा याकोबाने त्यांना पाहिले तेव्हा तो म्हणाला, “ही देवाची छावणी आहे.” म्हणून त्याने त्या जागेचे नाव महनाईम ठेवले.
TSK
TSK · 2 शमु 2:1
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
तो एलाजार याजकापुढे उभा राहील, तो त्याच्यावतीने उरीमाच्या निर्णयासाठी परमेश्वरास विचारील. त्याने व त्याच्याबरोबर इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्याच्या सांगण्यावरून बाहेर जावे व आत यावे.
¶ आणि परमेश्वराने यहोशवास सांगितल्यानुसार यहोशवाने यफुन्नेचा पुत्र कालेब याला यहूदाच्या वंशाबरोबर वाटा दिला, त्याने किर्याथ-आर्बा, म्हणजेच हेब्रोन शहर हे त्यास दिले; हा आर्बा अनाक्यांचा पूर्वज होता.
मग त्यांनी परमेश्वरास आणखी विचारले की, “तो पुरुष इकडे फिरून येईल काय?” तेव्हा परमेश्वराने उत्तर दिले, “पाहा तो सामानामध्ये लपला आहे.”
मग दावीदाने आणखी परमेश्वरास विचारले, आणि परमेश्वराने उत्तर देऊन म्हटले, “उठून खाली कईल्याकडे जा, कारण मी पलिष्ट्यांस तुझ्या हाती देईन.”
मग दावीद अहीमलेखाचा मुलगा अब्याथार याजक याला म्हणाला, एफोद माझ्याकडे आण. मग अब्याथाराने एफोद दावीदाकडे आणले.
दावीद हेब्रोनमध्ये राज्य करत होता. त्याने यहूदाच्या घराण्यावर साडेसात वर्षे राज्य केले.
दावीदाने परमेश्वरास विचारले, “मी पलिष्ट्यांवर चढाई करू का? तुझे साहाय्य मला लाभेल काय?” परमेश्वर उत्तरला, “होय पलिष्ट्यांच्या पराभवात मी तुला खात्रीने मदत करील.”
पुढे चार वर्षानी अबशालोम राजा दावीदाला म्हणाला, हेब्रोनमध्ये मी परमेश्वरास नवस बोललो होतो. तो फेडण्यासाठी मला जाऊ द्या.
देवाच्या निवासस्थानाच्या सेवेसाठी त्यांनी दिलेल्या वस्तू पाच हजार किक्कार सोने, दहा हजार किक्कार रुपे, अठरा हजार किक्कार पितळ, आणि एक लाख किक्कार लोखंड दिले.
हे परमेश्वरा तुझे मार्ग मला कळव, मला तुझे मार्ग शिकव.
सकाळी मला तुझ्या वात्सल्याचे शब्द ऐकू दे, कारण मी तुझ्यावर भरवसा ठेवला आहे. ज्या मार्गाने मी चालावे तो मला दाखव, कारण मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो.
प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी हे त्यांच्यासाठी करावे म्हणून इस्राएलाच्या घराण्याकडून पुन्हा मागणी होईल; कळपाप्रमाणे मी त्यामध्ये लोकांची वाढ करीन.