¶ अब्राहामाच्या दिवसात जो पहिला दुष्काळ पडला होता त्यासारखा दुसरा दुष्काळ त्या देशात पडला. तेव्हा इसहाक पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख याजकडे गरार नगरामध्ये गेला.
TSK
TSK · 2 शमु 21:1
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ कनान देशात दुष्काळ फारच तीव्र पडला होता.
मी तुमच्या धान्याचा पुरवठा बंद करील तेव्हा दहा स्त्रिया एकाच चुलीवर तुमची भाकर भाजतील व ती तुम्हास तोलून देतील; ती तुम्ही खाल पण तुम्ही तृप्त होणार नाही.
¶ परंतु इस्राएल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत अपराध केला; यहूदा वंशांतील जेरहाचा मुलगा जब्दी याचा मुलगा कर्मी याचा मुलगा आखान याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराचा कोप पेटला.
त्यांच्याशी आम्ही असेच वागणार; त्यांना आम्ही जिवंत राखणार; तसे न केल्यास त्यांच्याशी शपथ वाहिल्यामुळे आम्ही क्रोधास पात्र ठरू.”
मग त्यांनी परमेश्वरास आणखी विचारले की, “तो पुरुष इकडे फिरून येईल काय?” तेव्हा परमेश्वराने उत्तर दिले, “पाहा तो सामानामध्ये लपला आहे.”
म्हणून दावीदाने परमेश्वरास विचारले, तो म्हणाला, “मी जाऊन त्या पलिष्ट्यांना मारून कईल्याचे रक्षण करू काय?” मग परमेश्वर दावीदाला म्हणाला, जा पलिष्टयांना मारून कईल्याचे रक्षण कर.
तर कईलकर मला शौलाच्या हाती देतील काय? तुझ्या सेवकाने ऐकल्याप्रमाणे शौल खाली येईल काय? हे परमेश्वरा इस्राएलाच्या देवा मी तुला विंनती करतो, हे तू आपल्या सेवकाला सांग.” परमेश्वर बोलला, “तो खाली येईल.”
दावीदाने प्रार्थना केली. यावेळी परमेश्वराने सांगितले, “तेथे जाऊ नको त्यांना वळसा घालून पाठीमागे जा. मग तुतीच्या झाडाजवळ त्यांच्यावर हल्ला कर.
¶ इस्राएलवर परमेश्वराचा पुन्हा एकदा कोप झाला. आणि त्याने दावीदाला इस्राएलांविरुध्द चेतवले. दावीद म्हणाला, “आधी इस्राएल आणि यहूदा यांची शिरगणती करा.”
तेव्हा एलीया अहाबाच्या समोर जायला निघाला. तेव्हा शोमरोनात भंयकर दुष्काळ होता.
¶ अलीशामुळे जो मुलगा जिवंत झाला होता त्या मुलाच्या आईशी अलीशा बोलला. अलीशा म्हणाला, “तू आपल्या कुटुंबियासह दुसऱ्या देशात जा. कारण परमेश्वर या प्रदेशात दुष्काळ पाडणार आहे. आणि तो सात वर्षे चालेल.”
मी देवाला म्हणेन, मला उगाच दोष देऊ नकोस. तू मजशी विरोध का करतो ते मला सांग.
तू संकटात असता मला हाक मार, आणि मी तुला वाचवेन, आणि तू मला गौरव देशील.
¶ परमेश्वराचे वचन जे अवर्षणाबद्दल यिर्मयाकडे आले: