त्या दिवशी तेथे तुंबळ युध्द झाले. दावीदाच्या सैन्याने त्या दिवशी अबनेर आणि इस्राएल लोक यांचा पराभव केला.
TSK
TSK · 2 शमु 3:1
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या बाजूचा होता म्हणून दावीद अधिकाधिक सामर्थ्यवान होत गेला.
रहबाम यराबाम यांचे परस्परांत अखंड युध्द चाललेले होते.
बाशा इस्राएलवर राज्य करत असताना यहूदाचा राजा आसा याच्याशी त्याचे सर्वकाळ युध्द चालले होते.
आपली पत्नी जेरेश आणि आपले सगळे मित्र यांना त्याने जे जे झाले ते सगळे सांगितले, हामानाची पत्नी आणि त्यास सल्ला देणारे बुद्धीमान मित्र त्यास म्हणाले “मर्दखय यहूदी असेल तर त्याच्यावर तुमचे वर्चस्व होणे शक्य नाही. पण त्याच्यापुढे तुमचा अध:पात खचीतच होणार.”
पण चांगली माणसे मात्र न्यायाने जीवन जगत राहतात. ज्याचे हात निर्मळ तो अधिकाधिक सामर्थ्यवान होत जाईल.
ते सामर्थ्यापासून सामर्थ्यात जातात; त्यातील प्रत्येकजणाला सियोनेत देवाचे दर्शन लाभते.
¶ तुम्ही वर पाहत होता तेव्हा कोणा मनुष्याचा हात लागल्यावाचून एक दगड छेदला गेला आणि त्याने त्या पुतळ्याच्या लोखंडाच्या व मातीच्या पावलांवर आदळून त्यांचे तुकडे तुकडे केले.
‹मी फूट पाडायला आलो आहे, म्हणजे मुलाला त्याच्या पित्याविरुद्ध आणि मुलीला तिच्या आईविरुद्ध, सुनेला तिच्या सासूविरुद्ध उभे करायला आलो आहे.›
कारण आपले झगडणे रक्त आणि मांसाबरोबर नाही, तर सत्ताधीशांविरुद्ध, अधिकाऱ्याविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या अधिपतीबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्याविरुद्ध आहे.