TSK

TSK · 2 शमु 3:29

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तर मारणाऱ्याने त्यास त्याच्या वाया गेलेल्या वेळेबद्दल नुकसान भरपाई द्यावी व तो मनुष्य बरा होईपर्यंत त्याच्यासाठी लागणारा खर्च द्यावा.

इस्राएल लोकांस सांगा की एखाद्या पुरुषाच्या शरीरातून स्त्राव होत असल्यास तो पुरुष अशुद्ध होय.

देवाने हे केले, यासाठी की, यरूब्बालाच्या सत्तर पुत्रांच्या विरोधात केलेल्या हिंसाचाराचा बदला घ्यावा, व त्यांच्या रक्तपाताबद्दल त्यांचा भाऊ अबीमलेख दोषी ठरवला जावा; आणि त्याच्या भावांचा खून करण्यात त्यास मदत केली म्हणून, शखेम नगरातील लोकही जबाबदार धरले जावेत.

जरी इस्राएलाला जे सर्व चांगले दिले जाईल तरी जिथे मी राहतो त्या जागी दुःख पाहशील आणि तुझ्या घराण्यात सर्वकाळ कधी कोणी म्हातारा होणार नाही.

तेव्हा राजाने बनायाला हुकुम केला, “तो म्हणतो तसे कर त्यास तिथेच ठार कर, मग त्याचे दफन कर. म्हणजे मग आमच्या घराण्यावरचा यवाबाचा कलंक पुसला जाईल. यवाबाने निरपराधांची हत्या केली तो हा कलंक होय.

त्यांचा रक्तपात यवाबाच्या शिरी त्याच्या संततीच्या शिरी उलटवून सर्वदा राहील. पण दावीद, त्यांचे वंशज, त्याच्या घराण्यातील राजे आणि त्याचे राज्य यांना परमेश्वराच्या कृपेने निरंतर शांतता लाभेल.”

नामानचा कोड तुला आणि तुझ्या मुलांना सर्वकाळ लागून राहिल. अलीशाकडून गेहजी निघाला तेव्हा त्याची त्वचा बर्फासारखी पांढरी शुभ्र झाली होती. गेहजीला कोड उठले होते.

त्याचे दिवस थोडे होवोत; दुसरा त्याचा अधिकार घेवो;

ते पाहून तेथील रहिवाशी एकमेकांना म्हणू लागले, “हा मनुष्य खुनी असला पाहिजे, समुद्रातून जरी हा वाचला असला तरी न्यायदेवताही याला जगू देत नाही.”