TSK

TSK · 2 शमु 5:7

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

दावीदाचा मुक्काम किल्ल्यात होता व त्याचे नाव दावीदपूर असे दिले. मिल्लो नामक भाग त्याने उभारला. नगराच्या आत त्याने आणखी बऱ्याच इमारती उभारल्या.

¶ पुढे लोक दावीदाला म्हणाले, “ओबेद-अदोमाच्या कुटुंबाला आणि त्याच्या सर्व मालमत्तेला परमेश्वराचा आशीर्वाद आहे.” कारण देवाचा कोश तेथेच आहे. तेव्हा दावीदाने तो पवित्र कोश त्याच्या घरातून आपल्याकडे आणला. यावेळी दावीदाचा आनंद गगनात मावत नव्हता.

¶ मग दावीद मरण पावला. त्याच्या पुर्वजांसारखे दावीद नगरात त्याचे दफन झाले.

¶ इस्राएलमधील सगळी वडिलधारी मंडळी, सर्व घराण्यांचे प्रमुख आणि वंशातील मुख्य यांना राजा शलमोनाने आपल्याबरोबर यरूशलेम येथे यायला सांगितले. दावीद नगरातून म्हणजे सियोनेतून वरती परमेश्वराच्या कराराचा कोश मंदिरात आणण्यासाठी त्यांना त्याने बोलावले.

¶ पुढे शलमोनाने, परमेश्वराच्या कराराचा कोश दावीदाचे नगर, म्हणजेच सीयोनमधून, आणण्यासाठी इस्राएलातील सर्व वडीलधारी मंडळी, आपापल्या घराण्यांचे प्रमुख, यांना यरूशलेम येथे बोलावून घेतले.

¶ मिस्पा जिल्ह्याचा अधिकारी कोलहोजेचा पुत्र शल्लून याने झरावेशीची डागडुजी याने केली. त्याने वेस बांधून तिला छप्पर केले आणि वेशीचे दरवाजे बिजागऱ्यांसह लावले. मग दारांना कड्या व अडसर बसवले. शिवाय त्याने राजाच्या बागेलगतच्या शेलह तळयाची भिंतही बांधली. दावीद नगरातून पायऱ्या उतरण्याच्या जिन्यापर्यंत त्याने डागडुजी केली.

सीयोनामध्ये राहणाऱ्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा. ज्या महान गोष्टी त्याने केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा.

सियोने भोवती फिरा, शहर बघा, तिचे बुरुज मोजा.

याकोबाच्या सर्व तंबूपेक्षा परमेश्वरास सियोनेचे द्वार अधिक प्रिय आहे.

अगे सीयोन निवासिनी गजर कर आणि आनंदाने आरोळी मार, कारण इस्राएलाचा पवित्र तो तुझ्याठायी थोर आहे.”

पुष्कळ देश त्याच्याकडे जातील व म्हणतील, “या, आपण परमेश्वराच्या पर्वतावर, याकोबाच्या देवाच्या घराकडे जाऊ या. मग तो त्याचे मार्ग आपल्याला शिकवील, आणि आपण त्याच्या मार्गांचे अनुसरण करू.” कारण सियोनमधून नियमशास्त्र आणि यरूशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल.

परंतु तुम्ही सियोन पर्वताजवळ आणि जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरूशलेम, लाखो देवदूत