TSK

TSK · 2 शमु 9:13

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

शौलाचा मुलगा योनाथान याला मफीबोशेथ नावाचा मुलगा होता. इज्रेलहून शौल आणि योनाथान यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा हा मफीबोशेथ पाच वर्षांचा होता. शत्रूच्या भीतीने त्याची दाई त्यास घेऊन पळाली. पळापळीत तिच्या हातून तो खाली पडला आणि दोन्ही पायांनी अधू झाला.

त्यास दावीद म्हणाला, भिऊ नको; तुझे वडील योनाथान यासाठी मी तुझ्यावर अवश्य दया करीन. तुझ्या वडीलासाठी मी एवढे करीन, तुझे आजोबा शौल यांची सर्व जमीन मी तुला परत देईन आणि तू नेहमी माझ्या पंक्तीला भोजन करावे.

पण त्याने माझ्याशी लबाडी केली. माझ्याविरूद्ध तुमचे कान फुंकले. पण स्वामी, तुम्ही देवदूतासारखे आहात. आपल्याला योग्य वाटेल ते करा.