TSK

TSK · 3 योहा 1:11

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

वाईट कृत्ये करणे सोडून दे आणि चांगली कृत्ये कर. शांतीचा शोध कर आणि तिच्यामागे लाग.

जो कोणी आपल्या शेतात कष्ट करतो त्याच्याकडे विपुल अन्न असते, पण जो निरर्थक योजनेमागे धावतो तो बुद्धिहीन आहे.

‹कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही.›

‹जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्यास मान करील.›

¶ मी जसे ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे माझे अनुकरण करणारे व्हा.

¶ बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरण करणारे व्हा आणि आम्ही तुम्हास कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात, त्यांच्याकडे लक्ष द्या.

बंधूंनो, यहूदीयातील देवाच्या ज्या मंडळ्या ख्रिस्त येशूच्या ठायी आहेत त्यांचे अनुकरण करणारे झाला, म्हणजे त्यांनी यहूदयांच्या हातून जी दुःखे सोसली तशीच तुम्हीही आपल्या स्वदेशीयांच्या हातून सोसली;

आम्हास असे वाटते की, तुम्ही आळशी बनू नये. तर जे लोक विश्वासाद्वारे व धीराद्वारे देवाने दिलेल्या अभिवचनाचा वारसा मिळवतात अशा लोकांचे अनुकरण करणारे तुम्ही व्हावे.

¶ आणि तुम्ही जर चांगल्याविषयी आवेशी झाला, तर कोण तुमचे वाईट करील?

जो कोणी त्याच्याठायी राहतो तो पाप करीत नाही. जो कोणी पाप करीतो त्याने त्यास पाहिले नाही आणि त्यास ओळखलेही नाही.