TSK

TSK · प्रेषि 12:19

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

आणि दावीद रानातील गडामध्ये राहू लागला. तो जीफ रानात डोंगराळ प्रदेशात राहू लागला. शौल नित्य त्याचा शोध करीत गेला, परंतु परमेश्वराने त्यास त्याच्या हाती दिले नाही.

¶ एवढे झाल्यावर मर्दखय राजद्वाराशी परतला. पण हामान आपले तोंड झाकून शोक करीत घाईने घरी गेला.

यहोयाकीम राजाने लेखक बारूखाला व यिर्मया संदेष्ट्याला अटक करण्यासाठी हम्मेलेखाचा मुलगा यरहमेल व अज्रीएलाचा मुलगा सराया व अब्देलचा मुलगा शलेम्या यांना आज्ञा केली. पण त्यांना परमेश्वराने लपविले होते.

¶ ते गेल्यावर, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, बालक व त्याची आई यांना घेऊन मिसर देशात पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा कारण बालकाचा घात करण्यासाठी हेरोद राजा त्याचा शोध करणार आहे.”

¶ त्या स्त्रिया शिष्यांना सांगण्यासाठी गेल्या. तेव्हा कबरेवरील पहारेकरी शिपायांतील काहीजण नगरात गेले आणि त्यांनी घडलेले सर्व मुख्य याजकांना सांगितले.

आपण अजोत नगरात आहोत. असे फिलिप्पाला दिसून आले आणि पुढे जात असताना जी जी गावे लागली त्या सर्व गावात त्याने सुवार्ता सांगितली, नंतर तो कैसरीया शहरास गेला.

¶ पेत्र दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता, त्यास दोन साखळ्यांनी बांधले होते, तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते, ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की, दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे.

आणि दुसऱ्या दिवशी निघून आम्ही कैसरीयास आलो व सुवार्तिक फिलिप्प याच्या घरी जाऊन राहिलो, तो निवडलेल्या सात सेवकांपैकी एक होता.

तेव्हा शिपायांनी कैद्यांना मारण्याचे ठरवले, यासाठी की त्यांच्यातील कोणी पोहोत जाऊन पळू नये.