मी तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये आणि तुझ्या वंशजांमध्येही पिढ्यानपिढ्या कायम लागू राहील असा सनातन करार करीन, तो असा की, मी तुझा आणि तुझ्यानंतर तुझ्या वंशजांचा देव होईन.
TSK
TSK · प्रेषि 13:17
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी आता फारोला काय करतो ते तू बघशील; मी माझे बाहुबल त्यास दाखवले म्हणजे मग तो माझ्या लोकांस जाऊ देईल. कारण माझ्या बाहुबलामुळे तो त्यांना आपल्या देशातून बाहेर घालवून देईल.”
तुझ्या हातावर आणि तुझ्या दोहो डोळ्यांच्या मध्यभागी हे स्मारक चिन्ह व्हावे. कारण परमेश्वराने आपल्या हाताच्या बलाने आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले.”
परमेश्वर सर्व देवांहून श्रेष्ठ आहे हे आता मला कळले. इस्राएल लोकांपेक्षा स्वत:ला श्रेष्ठ मानत असलेल्या मिसरी लोकांचे त्याने काय केले हे मला समजले.”
दुसऱ्या राष्ट्रात जाऊन त्यातून एक राष्ट्र आपलेसे करायचे असा दुसऱ्या कुठल्या देवाने प्रयत्न तरी केला आहे का? नाही ना? पण आपल्या परमेश्वर देवाने मिसर देशात तुमच्यासाठी महान गोष्टी केल्याचे तुम्ही स्वत: पाहिले, त्याने तुमच्यासाठी संकटे, चिन्हे, चमत्कार, युद्धे, पराक्रमी हात आणि उगारलेला भूज ह्याद्ववारे भयप्रद कार्ये केली.
कारण तुम्ही तुमचा देव परमेश्वराची पवित्र प्रजा आहात. जगाच्या पाठीवरील सर्व लोकांमधून त्याने आपली खास प्रजा म्हणून तुमचीच निवड केली आहे.
तुम्ही फार चांगले आहा आणि योग्य मार्गाने जगता म्हणून तुम्ही येथे राहायला जाणार आहात असे नाही. या राष्ट्रांच्या दुष्टपणामुळे तुमचा देव परमेश्वर त्यांना घालवून देत आहे आणि अब्राहाम, इसहाक व याकोब या पूर्वजांना दिलेला शब्द तो पाळत आहे.
कारण इतरांपेक्षा तुम्ही वेगळे आहात. तुमचा देव परमेश्वर याची पवित्र प्रजा आहात. आपली खास प्रजा म्हणून त्याने भुतलावरील सर्व राष्ट्रातून तुमची निवड केली आहे.
¶ हे परमेश्वरा, तूच देव आहेस. ज्याने अब्रामाची निवड केली आणि बाबेलमधील (खास्द्यांच्या) ऊर नगरातून तू बाहेर काढून त्यास अब्राहाम असे नाव दिले.
मिसर देशातल्या सोअन प्रांतात त्यांच्या वडिलांच्या दृष्टीसमोर त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या.
तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशजहो, तुम्ही त्याचे निवडलेले याकोबाचे लोकहो,
त्याने आपला सेवक मोशे आणि आपण निवडलेला अहरोन यांना पाठविले.
आमच्या वडिलांनी मिसर देशात तुझ्या आश्चर्यकारक कृत्याचे महत्व ओळखले नाही; त्यांनी तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेच्या कृत्यांकडे दुर्लक्ष केले; तर समुद्राजवळ, लाल समुद्राजवळ त्यांनी बंडखोरी केली.
कारण परमेश्वराने याकोबाला आपल्यासाठी निवडले आहे, इस्राएल त्याच्या मालमत्तेप्रमाणे आहे.
त्याने मिसराचे पहिले जन्मलेले मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
तर आता याकोबा, माझ्या सेवका आणि इस्राएला, ज्या तुला मी निवडले आहे तो तू माझे ऐक.
तू मिसर देशात चिन्ह व चमत्कार केलेस. आजपर्यंत येथे इस्राएलात आणि सर्व मानवजातीत तू आपल्या नावाची किर्ती केली आहे.
तुम्हास मिसरमधून आणणारा मीच आणि चाळीस वर्षे मीच तुम्हास वाळवंटातून पार नेले ह्यासाठी की अमोरींचा प्रदेश तुम्ही काबीज करावा.
जेव्हा तू मिसरदेशातून बाहेर निघालास, त्या दिवसाप्रमाणे त्यास मी अद्भुत कृत्ये दाखवीन.
¶ पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय याजकगण, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा; ह्यासाठी की, तुम्हास ज्याने अंधारातून आपल्या अद्भूत प्रकाशात बोलावले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.