TSK

TSK · प्रेषि 16:14

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तुझे वैभवशाली सामर्थ्य दाखवण्याच्या दिवशी पवित्र पर्वतावर तुझे लोक स्वसंतोषाने पुढे होतात, पहाटेच्या उदरातून आलेले दवासारखे तुझे तरुण तुला आहेत.

प्रभू परमेश्वराने माझा कान उघडला आहे, आणि मीही बंडखोर झालो नाही किंवा मागे वळलो नाही.

‹ज्याने मला पाठवले आहे त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्यास शेवटल्या दिवशी मी उठवीन.›

मग तो उठला. व गेला, रस्त्यात त्यास एक इथिओपियाचा मनुष्य भेटला, तो मनुष्य षंढ होता, तो इथिओपियाच्या कांदके राणीकडे उच्च पदावर अधिकारी म्हणून कामाला होता. तो राणीच्या खजिन्याचा मुख्य होता, तो यरूशलेम शहरास उपासना करण्यासाठी गेला होता.

प्रभू विश्वास ठेवणाऱ्यांना मदत करीत होता आणि बऱ्याच मोठ्या गटाने विश्वास ठेवला व ते प्रभूला अनुसरू लागले.

तर मग जो इच्छा धरतो त्याच्यामुळे नाही किंवा जो धावतो त्याच्यामुळे नाही, पण जो देव दया करतो त्याच्यामुळे हे आहे.

पण त्यांची मने कठीण केली गेली कारण आजवर ते आच्छादन, तसेच जुन्या कराराच्या वाचनात, न काढलेले राहिले आहे; ते ख्रिस्तात नाहीसे झाले आहे.

मी अशी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, ह्याने तुम्हास आपल्या ओळखीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा;

¶ माझ्या प्रिय बंधूंनो, स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका.

¶ ‹थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही:› ‹ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय चमकणाऱ्या सोनपितळासारखे आहेत तो देवाचा पुत्र हे सांगत आहे, ›

¶ ‹पाहा, मी दाराजवळ उभा आहे व दरवाजा ठोकीत आहे. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दरवाजा उघडतो, तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर भोजन करेन व तोसुध्दा माझ्याबरोबर भोजन करेल.›