TSK

TSK · प्रेषि 16:9

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

ती समुद्रापलीकडे नाही की, “आम्ही ती पाळावी म्हणून कोण समुद्र पार करून जाईल व तेथून आणून आम्हांला ऐकवील?” असे तुम्हास म्हणावे लागेल.

¶ परमेश्वराचा दूत फिल्लीपाशी बोलला तो म्हणाला, “ऊठ आणि यरूशलेम शहराहून गज्जा शहराकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा.” तो रस्ता वाळवंटातून जातो.

यापो येथील शिष्यांनी ऐकले की, पेत्र लोदमध्ये आहे, लोद हे यापोजवळ आहे, म्हणून त्यांनी दोन माणसे पाठविली, त्यांनी त्यास विनंती केली, ते म्हणाले, “त्वरा करा, आमच्याकडे लवकर या.”

पेत्राला भूक लागली होती, त्यास काही खावेसे वाटले, ते पेत्रासाठी जेवणाची तयारी करीत असता पेत्राला तंद्री लागली.

म्हणून यापो या शहरी काही माणसे पाठव व शिमोन पेत्राला बोलावून घे, पेत्र हा शिमोन चांभाराच्या घरी राहत आहे आणि त्याचे घर समुद्राच्या जवळ आहे.

¶ जेव्हा सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून परत आले, तेव्हा पौल यहूदी लोकांस उपदेश करण्यात आपला सर्व वेळ घालवू लागला, येशू हाच ख्रिस्त आहे. अशी साक्ष देऊ लागला.

¶ या गोष्टी घडल्यानंतर पौलाला पवित्र आत्म्याने सुचवले की, मासेदोनिया व अखया या प्रांतांतून प्रवास करीत पुढे यरूशलेम शहरास जायचे आहे, तो म्हणाला, “मी तेथे गेल्यांनतर मला रोम शहरही पाहिलेच पाहिजे.”

त्याठिकाणी तो तीन महिने राहिला, पौल सिरीया प्रांताला समुद्रमार्गे निघाला असता, यहूदी लोकांनी त्याच्याविरुध्द कट रचला, हे पाहून त्याने मासेदोनियातून परत फिरण्याचे ठरवले.

मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची उपासना मी करतो, त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहीला.

कारण मासेदोनियाला व अखयाला हे बरे वाटले की, यरूशलेम शहरात राहत असलेल्या पवित्र जनांत जे गरीब आहेत त्यांच्यासाठी काही भागी करावी.

¶ बंधूनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हास कळवतो.

आणि मी तुम्हाजवळ होतो तेव्हा मला कमी पडले असतानाही मी कोणाला भार असा झालो नाही कारण मासेदोनियाहून जे बंधू आले त्यांनी माझी गरज पुरविली आणि सर्व गोष्टीत मी तुम्हास ओझे होऊ नये म्हणून मी स्वतःस ठेवले आणि यापुढेही ठेवीन.

आणि प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये म्हणून माझ्या देहात एक काटा दिलेला आहे, तो मला ठोसे मारणार्‍या सैतानाचा दूत आहे; म्हणजे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये. म्हणून तो ठेवण्यात आला आहे.

आणि अखिल मासेदोनियांतील सर्व बंधुवर्गावर तुम्ही ती करीतच आहात. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करतो की, ती अधिकाधिक करावी.