मग ते एकमेकांना म्हणू लागले, “तो वाटेवर आपणाशी बोलत असताना व शास्त्रलेखाचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?”
TSK
TSK · प्रेषि 17:3
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
मग तो त्यांना म्हणाला, ‹“पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख भोगावे आणि मरण पावलेल्यातून तिसऱ्या दिवशी उठावे, ›
नंतर तो त्यांच्याशी एकत्र असता त्याने त्यांना आज्ञा केली की, ‹“यरूशलेम शहर सोडून जाऊ नका तर पित्याने देऊ केलेल्या, ज्या देणगी विषयी, तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे त्याची वाट पाहा.›
परंतु आपल्या ख्रिस्ताने दुःखे सोसावी, म्हणून देवाने आपल्या सर्व संदेष्ट्याच्या तोंडाने जे पूर्वी कळवले होते, ते याप्रमाणे पूर्ण केले आहे.
परंतु शौल अधिकाधिक सामर्थ्यशाली होत गेला, त्याने हे सिद्ध केले की, येशू हाच ख्रिस्त आहे आणि त्याचे पुरावे इतके सबळ होते. दिमिष्क येथील यहूदी त्याच्याबरोबर वाद घालू शकले नाहीत.
जाहीर वादविवादात त्याने यहूदी लोकांस फार जोरदारपणे पराभूत केले आणि पवित्र शास्त्रलेखाच्या आधारे येशू हाच ख्रिस्त आहे हे सिद्ध केले.
¶ अहो बुद्धीहीन गलतीकरांनो, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्हास कोणी भुलविले आहे?